दारव्हा शहरात शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने संपूर्ण शहराचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. अवघ्या तीन तासांच्या या धुवाधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. नातूवाडी, जीरापुरे नगर, भाग्योदय कॉलनी, बसस्थानका मागील परिसर, न्यायालय चौक आदी भागांत नागरिकांना अक्षरशः जलप्रलयाचा सामना करावा लागला.