आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता भाजप आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली की, लाडक्या बहिणींचं सुख विरोधकांना खुपतंय. महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्यांची तुतारी वाजते. मात्र, महायुती सरकार ठाम असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने न्यायालयात लाडक्या बहिणींची बाजू ठामपणे मांडली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.