आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज पहाटे काटली-साखरा गावाजवळ एक भीषण अपघात घडला.भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी अपघातस्थळी भेट देत आपले दुःख व्यक्त केले. "ही घटना केवळ अपघात नव्हे, तर कुटुंबाचा आधार हरपल्यासारखी आहे. जे युवक आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत करत होते, त्यांचा असा अकाली अंत हा समाजाचीच हानी आहे.असे त्यांनी सांगितले.