आरमोरी तालूक्यातील जगदंब नवदुर्गा उत्सव मंडळ वडधा यांचा वतीने वडधा येथे दूर्गा मातेचा मंडप पूजन कार्यक्रम आज दि.२७ आगस्ट बूधवार रोजी दूपारी १ वाजता हरबाजी पाटील बोरकूटे यांचा हस्ते संपन्न करण्यात आला.याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक के डब्ल्यू राऊत रमेश कोलते मोहन लाकडे ओंकार लडके विजय फूलबांधे सूरेश पगाडे तसेच मंडळाचे पदाधिकारी रोशन भजभूजे महादेव मसराम रामदास गंडाटे आदि हजर होते नवरात्र उत्सवात येथे कोल्हापुर येथून दिव्य ज्योती आणत भाविकाना दर्शन घडविण्यात येणार आहे.