सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.कौशल्या बाबासाहेब सोनवणे (वय ३५, सध्या रा. सणसवाडी, मूळ रा. चोंडी ता. धारूड, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी बाबासाहेब हरिकिसन सोनवणे (वय ४१) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.