सिंहगड कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एका विद्यार्थिनीने कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप केले असून, तिने सांगितले की, कॉलेजने तिच्याकडून ३ लाख रुपये घेतले आणि त्याऐवजी तिची जागा दुसऱ्या उमेदवाराला विकली. या आरोपामुळे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.