मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज दिनांक सहा स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास खुलताबादला भेट देऊन दर्गा हजरत सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी उर्फ बावीस ख्वाजा रह. तसेच हजरत बाबा बुरहानोद्दीन गरीब रह. येथे हजेरी लावून दर्शन घेतले. त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आणि शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणीही केली.