धुळे शहरालगतच्या नगाव बारी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गट क्रमांक ३२८ मधील एका शेतातील विहिरीत मेंढपाळ समाजातील एका विवाहितेचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. मृत महिलेचे नाव दुर्गाबाई साहेबराव टिळे (वय अंदाजे वीस ते पंचवीस ) असे आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.