घरासमोर गोंधळ घालू नका असे म्हटल्याने चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच एका दुचाकीचे नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 27) दगडोबा चौक चिंचवड येथे घडली. ऋषिकेश दत्ता जगताप (वय 23, रा. दगडोबा चौक, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.