सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले. यामध्ये काटोल येथे रिलायन्स कंज्यूमर प्रॉडक्ट लिमिटेड यांच्याकडून खाद्य पेय आणि अन्न उत्पादनाच्या निर्मितीसाठी एकात्मिक सुविधासाठी प्रकल्प निर्मितीसाठी 1513 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून याद्वारे 500 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी 11 सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता दिली.