मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे 10 थर रचून विश्वविक्रम रचला होता. परिवहन मंत्री तथा ओवेला मजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले होते. 10 थर रचल्याबद्दल कोकण नगर गोविंदा पथकाचा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास ओवळा येथील शिंदे गटाचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.