धामणी धरण परिसरात बिबट्याचा वावर असल्याची घटना समोर आली आहे. धामणी धरण परिसरातील रस्त्यावरून जाणाऱ्या काही तरुणांना रस्त्यालगत झाडावर काहीशी बिबट्याची हालचाल दिसून आली. त्यानंतर तरुणांनी मोबाईल कॅमेरा काढत बिबट्या कॅमेरात कैद केला. बिबट्या झाडावर बसल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.