अक्कलकोट तालुक्यातील मौजे सातनदुधनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी मनमानी कारभार करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत रासपचे अक्कलकोट तालुका युवक अध्यक्ष संतोष शिंदे आणि शालेय समितीचे अध्यक्ष श्रीपती काळे यांनी शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या २ महिन्यापासून शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सातनदुधनी येथील जिल्हा परिषद शाळेतील मनमानी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत आलो आहोत.