मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आजही सुरूच आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून, जरांगे पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आजपासून ते पाणी न पिता आंदोलन करणार आहेत. आजपासून ते अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.