मोताळा तालुक्यातील मूर्ती येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आला होती.यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या. येणाऱ्या काळात गावकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर भक्कमपणे पाठीशी उभे राहून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.