ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. 30 ऑगस्ट पासून नागपूरच्या संविधान चौकात महासंघाचे साखळी उपोषण सुरू होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी तून दुसऱ्या कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजातर्फे केली जात आहे.