मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नम्रपणे विनंती करते की त्यांनी चर्चेसाठी विधानसभा बोलावावी आणि ताबडतोब निर्णय घ्यावा. 'सबका साथ सबका विश्वास' ही त्यांची स्वतःची ओळ आहे, बरोबर ना? अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.