पुण्यात जे पब चालतात त्यामध्ये अनेक पोलिसांची पार्टनरशिप आहे. पहाटे चारपर्यंत चालणारे पब हे महानगरपालिकेने पाडले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने हे पब सुरू होते. हे पब पाडले असताना पोलिसांनी यांच्यावर कोणती कारवाई केली? कोणते पब पाडल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना द्यावे असा सवाल दंगेकर यांनी केला आहे.