पुण्यातील शनिवार वाडा येथे आज सकाळच्या सुमारास बेवारस बॅग आढळली होती. या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे डॉग स्क्वाड पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शनिवार वाड्याची संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याबाबत कोणातही धोका नसल्याचे स्पष्टीकरण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.