दिनांक 26.8.2025 रोजी इंद्रावती नदी चे पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच भामरागड लगतचे छत्तीसगड राज्यातील भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीचे पाणी पातळी मध्ये वाढ होऊन भामरागड येथे पर्लकोट नदीला पूर आलेला आहे. पुराचे पूर्व सूचना लक्षात घेऊन काल रात्रीच भामरागड शहरातील बाजारपेठेतील दुकानातील साहित्य प्रशासनाद्वारे आधीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.