वाहतूक शाखा पोलिसांचे पथक पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील कोराडी नाका येथे ऑपरेशन न्यू टर्न राबवित असताना त्यांना स्कार्पियो ने येणारा व्यक्ती संशयितरिता आढळून आला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सहा ग्रॅम एमडी आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक आरोपी दानिश खान याला अटक केली असून त्याच्याकडून एमडी मोबाईल व वाहन असा एकूण 18 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.