दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शहरात, गावात, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्या हेतुने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी अगर मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33,37 व 40 प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत, याबाबतचा जाहीरनामा असून गणेशोत्सव गणेशोत्सव शांततेत आणि सामंजस्याने साजरा करावा.