एका तरुणाने ओळखीच्या व्यक्तीला मोटारसायकल चालवायला न दिल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.राजेश शेट्टी (४७, काळमेघ नगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर उदय पांडे (२३, संजय नगर) हा आरोपी आहे. दोघेही एकमेकांना ओळखतात. शेट्टी कामावरून घरी परतत असताना उदयने त्यांना हिंगणा मार्गावर थांबवले. त्याने त्याला दुचाकी चालविण्यासाठी मागितली. शेट्टीने नकार दिल्यावर उदयने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर कटरने त्यांच्यावर वार केल.