आज दिनांक 12 सप्टेंबर सकाळी 11 वाजता शहरातील एमजीएम महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या तरुणींची महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एका रोडरोमियोने कर्णकर्कश आवाजात स्पोर्ट बाईक चालवून छेड काढली.आरोपीने याचा व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल केला. ही बाब सिडको पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.माफीनाम्यानंतर आता आरोपीने जिथे मुलींची छेड काढली तिथेच पोलिसांनी आरोपीची धिंड काढली.शेख समीर शेख सलीम रा.इंदिरा नगर बायजीपुरा असे आरोपीचे नाव आहे.