येत्या ३० तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी उद्या भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी रॅलीचे आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी रात्री १२ च्या सुमारास केलं आहे.