लोणावळा शहरात एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी परिसरातील सार्वजनिक शौचालयात घडली.