बाम्हणी येथील रेल्वे फाटकाजवळ आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत डोंगरगाव तालुका देवरी येथील अंतिम ओमप्रकाश खोटेले यांच्या रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला यासंदर्भात मृतकाचे वडील ओमप्रकाश माधव खोटेले यांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये तोंडी फिर्याद दिली असून स्टेशन मास्टर आमगाव यांनी दिलेल्या मेमोवरूनही घटनेची नोंद करण्यात आली आहे ही घटना आज सकाळी डाऊन लाईन केएम 974/16-10 या ठिकाणी घडली मृत्यूचे कारण रेल्वेने कटून मृत्यू असे नमूद करण्यात आले आहे.