गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ववस्त झाला आहे.या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी "ओला दुष्काळ" जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.