श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर येथील, बाळू मामांचे सेवक तसेच श्री बाळूमामा देवस्थानचे मुख्य भाकणूक कार, कृष्णात बाबुराव डोने, वाघापूरचे महाराज यांनी साताऱ्यातील जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची आज रविवार दिनांक 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता भेट घेतली यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजू गोडसे यांनी व श्री संत बाळूमामा यांचे सर्व अनुयायांनी प्रयत्न केले.