फिर्यादी आशिष पांडुरंग मेश्राम यांच्या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपी दिवाण टेकाम याने फिर्यादीचे वडील पांडुरंग मेश्राम यांच्यासोबत बैल बांधण्याच्या जागेवर कुत्र्यांनी संडास केल्याच्या कारणातून वाद करून काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 22 ऑगस्ट ला रात्री अंदाजे साडेआठ वाजताच्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.