विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी १९ जुलै रोजी रात्री ८ वाजता केंद्र सरकारवर आपल्या एक्स या समाज मध्यामवरून टीका केली. एरवी पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा भाग असल्याचे ठासून सांगणाऱ्या केंद्र सरकारने शासकीय कार्यक्रमातील ध्वनीचित्रफितीमध्ये पाकव्याप्त काश्मिर हा भारतापासून वेगळा दाखवून तो भाग पाकिस्तानात असल्याचे दाखवले आहे. एवढ्यावरच न थांबता सियाचिन हा प्रदेश देखील रेखांकित (डॉटेड लाईन) दाखवून त्याची वेगळी ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे अस म्हणत केंद्र सरकारवर टीका केली