हातणी ते दुधा राष्ट्रीय महामार्गावरील रायपुर येथे वाहनांची मोठी वर्दळ असते.पुढे सैलानी बाबा यांची दरगाह असल्याने याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दररोज संध्याकाळपासून ते रात्री 8 वाजे पर्यंत भाजीपाला घेवून जाणारे भरधाव पीकअप,आयशर वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्यासाठी उपाययोजना तत्काळ करणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ दाखल घेत रायपूर परिसरात गतिरोधक बसवावे अशी मागणी बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच रस्ता सुरक्षा समितीकडे एकता ग्रुपने निवेदनात केली आहे.