मराठा आरक्षण संदर्भात दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढला तो त्वरित रद्द करावा या मागणीसाठी निफाड तालुका समता परिषदेच्या वतीने निफाडच्या तहसीलदार विशाल नाईकवडे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे कि,मा. मुख्यमंत्री साहेब ओबीसी मध्ये पहिल्याच साडे तीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाहीये. त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसी वर अन्याय आहे