खासदार प्रफुल्ल पटेल उद्या 31 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर राहणार असून ते विविध ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास देण्यात आली आहे. ते भंडारा शहरातील विविध श्री गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन गणेशजींचे दर्शन घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ते गणेशपुरचा राजा सन्मित्र गणेश मंडळ गणेशपुर, मानाचा महागणपती नव बजरंग गणेशोत्सव मंडळ बजरंग चौक, म्हाडाचा गणपती म्हाडा कॉलनी येथे भेट देणार आहेत.