धाराशिव जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्रावरील १०० टक्के पिके बाधीत झालेली असतानाही प्रशासनकडून दिलेल्या प्राथमिक अहवालात नुकसान बाधीत क्षेत्र कमी दर्शविले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे अजून आदेश आलेले नाहीत,परीणामी शेतकरी मदतीपासुन वंचित राहण्याची शक्यता आहे.एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित राहील्यास याची जबाबदारी प्रशासनाची असेल असाही इशारा आमदार कैलास पाटील यांनी आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वा.दिला आहे.