जालना शहरातील काद्राबाद येथील पोलास गल्ली परिसरातील नागरिकांनी नाले, गटारे व चेंबरांची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी महानगरपालिकेकडे बुधवार दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता केली आहे. या परिसरातील नाले व चेंबरांची नियमित साफसफाई न झाल्याने डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. गटारातील चेंबर वारंवार तुंबत असल्याने पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे घरात व बाथरूममध्ये घाण पाणी शिरून रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.