शेवगाव तालुक्यातील बाळमटाकळी येथे दोन दिवसांपासून मोबाईल टॉवरला जीओ, एयरटेल, आयडीया या कंपन्यांच्या सीमकार्डची रेंज गेल्याने सर्व व्यवहार ठप्प झालेत. त्यामुळे ग्राहकही वैतागले आहेत. दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालय. त्यातच मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क तुटलाय. जनरेटर असूनदेखील टॉवर का बंद आहेत याची चौकशी करावी अन्यथा बालमटाकळी येथील ग्रामस्थ शोले स्टाईल आंदोलन तोल असा इशारा सरपंच राम बामदळे यांसह ग्रामस्थांनी केला आहे.