नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात असं काही अकराच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कुठलाही अपघात झालेला नाही. मात्र घाटाच्या दोघंही बाजूस वाहतूक ठप्प झाले आहे. वाहतूक ठप्प झाल्याने घाट मार्गात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.