साकोली तालुक्यातील सावरबंध येथील श्री संत विदेही मोतीराम बाबा आश्रमात तर उमरी येथील इंद्रपुरी टोली येथे व पिंडकेपार येथील जागृत श्रीराम मंदिर परिसरात शनिवार दिनांक 23 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते बाळ गोपाळांनी सजवून आणलेल्या लाकडी नंदीबैलांचे पूजन करून त्यांना विशेष पारितोषिक देऊन मोठ्या उत्साहात तान्हापोळा साजरा झाला