छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दोन बांधकाम व्यावसायिक यांचे कडून ५००००/- दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मनपा तर्फे ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दिली. शहरात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच यामुळे प्रदूषण होते या करिता मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरात यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे.