नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिस्मिल्ला नगर परिसरात हातात कोयता आणि चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपींची नावे शेख समीर बिस्मिल्ला (१९, रा. हजरा नगर) आणि नावेद खान उर्फ अहमद खान (२०, रा. बिस्मिल्ला नगर) अशी आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बिस्मिल्ला नगर भागात दोन तरुण शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, अशी गोपनीय माहिती नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अंमलदार अहमद अली,