आज दि.1सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भोकरदन तालुक्यातील इब्राहिम पूर्व कोल्हापूर येथील मराठा समाज बांधवांनी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी खाण्या पिण्याचा साहित्य पाठवला आहे,कारण त्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलन करताना खाण्यापिण्याच्या साहित्याची उणीव भासू नये म्हणून ट्रक भरून साहित्य पाठवले आहे, व यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणाबाजी करत हे ट्रक मुंबईच्या दिशेने रवाना झाले.