कऱ्हे टाकळी गावाच्या विविध प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांचे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण. शेवगाव तालुक्यातील कऱ्हे टाकळी येथील दलित बांधव शेवगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज शुक्रवार दिनांक 29 रोजी आमरण उपोषणास बसले आहेत. हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्यारे लाल शेख यांच्या उपस्थितीत होत आहे.