उदगीर तालुक्यातील चोंडी तांडा येथे अनेक दशकानंतर तहसीलदार राम बोरगांवकर यांच्या पुढाकाराने कच्चा रस्ता झाला, रस्त्याचा वनवास संपला परंतु चोंडी तांडा व चोंडी या दोन गावच्या मध्यभागी नदी असल्यामुळे पावसाळ्यात चोंडी तांड्यातील नागरिकांना व शाळकरी मुलांना शाळेत येजा करण्यासाठी जीव मुठीत धरून पाण्यातून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे, एखाद्या व्यक्ती आजारी पडला तर बाजेवर घालून नदी पार करावी लागत आहे, रस्त्याचा वनवास संपला तरी नदीवर पूल बांधणे गरजेचे आहे.