आज गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास रायगडमधील सुतारवाडी येथील कार्यालयात ‘जनता संवाद’चे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘जनता संवाद’च्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. सर्वांनी मनमोकळेपणाने आपले प्रश्न, अडचणी व विविध निवेदनांसह मागण्या मांडल्या.