सेमिनरी हिल्स परिसरात आज नऊ फूट लांबीचा धामण प्रजातीचा साप आढळला. साप दिसताच नागरिकांची तारांबळ उडाली. त्यांनी तात्काळ वाइल्डलाइफ रेस्क्यूर शुभम जीआर याला माहिती दिली माहिती मिळताच शुभम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता टीनाच्या खाली दडून बसलेल्या सापाला सुरक्षित रेस्क्यू केले आणि निसर्गाच्या अधिवासात सोडले. ज्यामुळे तेथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.