दोन दिवसापूर्वी हरणघाट पुलाजवळ अपघात झाला. त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर दुखापत असल्याने नागपुर येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान 2 सप्टेंबर मंगळवारी रात्री दहा वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. दिनांक 3 सप्टेंबर बुधवारी दुपारी चार वाजता खंडाळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मजी आमदार डॉ देवराव होळी यांचा अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्याची ओळख होती.