चायगांव येथून 23 वर्षीय महिला बेपत्ता हरवल्याची तक्रार मेहकर पोलीस स्टेशन येथे दाखल चायगांव तालुका मेहकर येथून 23 वर्षीय महिला दहा सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित नातेवाईकांनी मेहकर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. या महिलेचा सर्वत्र शोध घेतला परंतु कोठेही थांग पत्ता न लागल्यामुळे सौ.साक्षी समाधान देशमुख बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस करीत आहे.