आजमितीस तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असून सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वत्र केला जात आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी -कर्मचार्यांनी शासकीय कामकाज करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणात केले. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजता MKCL मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण आयोजित केले होते.