यवतमाळ येथील भोसा तलावजवळ दिनांक 26 ऑगस्ट रोजी ट्रक क्रमांक एमएच 16 सीबी 1777 मध्ये 6 ब्रास रेती चोरून वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत ट्रकसह रेती असा एकूण 6 लाख 50 हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालक अजय तलाम याच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.